गणवेश वाटपाबाबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष

0

जळगाव । इयत्ता 1 ली ते 8 वीच्या विद्यार्थ्यांसाठी शासनातर्फे मोफत गणवेशाचे वाटप करण्यात येत असतांना जिल्हा परिषदेमार्फे संपुर्णपणे नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरण दाखल केलेल्या प्रकरणात शुक्रवारी न्यायालयात झालेल्या कामकाजात जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी निरूपमा रॉय-डांगे यांची न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष नोंदविण्यात आली. विद्यार्थ्यांचा गणवेश स्थानिक बचत गटांकडून शिवायचा होता. मात्र जिल्हा प्रशासनाने औरंगाबाद येथील श्रद्धा महिला विकास महामंडळाकडून शिवून घेतले होते. तक्रारीअंती याप्रकरणाची तत्कालीन सीईओ डांगे यांनी चौकशीचे आदेश केले होते. शासन निर्णयाचा भंग केल्याचे त्यात निष्पन्न झाल्याने याप्रकरणी भुसावळ प.सं.चे गटविकास अधिकारी रमेश तायडे यांच्या फिर्यादीवरून भुसावळ प.स.च्या शिक्षण विस्तार अधिकारी कल्पना चव्हाण यांच्याविरूध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्यावर या खटल्याच्या चौकशीचे कामकाज होत असून आज याप्रकरणी न्या. के.एस. कुळकर्णी यांच्या न्यायालयात निरूपमा डांगे यांची व्हिडीओव्दारे सरकारी वकील अ‍ॅड. हेमंत मेंडकी यांनी सरतपासणी घेतली. तर संशयीताच्यावतीने अ‍ॅड. शिरीष वाणी यांनी उलट तपासणी घेतली. याप्रकरणी 23 एप्रिल रोजी पुढील सुनावणी होणार आहे.