चोपडा । विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण मिळाल्याने त्यांचे व्यक्तिमत्व घडविण्यासाठी गणिताचे शालेय जीवनात खूप महत्व आहे. गणितातील विविध संकल्पना सोप्या प्रकारे मुलांसमोर ठेवल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. या कार्यशाळेत गणितातील मुलभूत संबोध मुलांना सोप्या भाषेत समजावताना विविध वस्तू, साहित्य वापरून गणिती दृष्टीकोन व वृत्ती वाढीस लागून तार्किक विचाराचा पाया घट्ट होतो व अचूक मार्गदर्शनाने विद्यार्थ्याच्या व्यक्त स्वभावात अनेक अमुलाग्र बदल घडून येतात.
प्रताप विद्या मंदिराच्या शताब्दीनिमित्त कार्यशाळेचे केले आयोजन
या दोन दिवसीय कार्यशाळेच्या वेळेच्या नियोजनातून गणिताचा मुख्य उद्देश दिसून आल्याचे प्रतिपादन मार्गदर्शक प्रा. विपुला अभ्यंकर यांनी आपल्या मनोगतातून केले. चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित प्रताप विद्या मंदिराच्या शताब्दीनिमित्त आयोजित गणित प्रगल्भीकरण कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर संस्थेच्या सचिव माधुरी मयूर, मार्गदर्शक प्रा.विपुला अभ्यंकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सुनील पाटील, पर्यवेक्षक ए.टी.पाटील उपस्थित होते. कार्यशाळेत सहभागी विविध शाळांतील शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्यातून काहींनी मनोगत व्यक्त केले.