मुंबई । कोकणामध्ये गणेशोस्तव साजरा करण्यासाठी जाणार्या गणेश भक्तांना विनामूल्य टोल पास देण्याचा प्रारंभ वाशी उपप्रादेशिक करण्यात आल्याची माहिती सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र सावंत यांनी दिली. त्यामुळे पुणेमार्गे जाणार्या गणेश भक्तांना कोणताही भुर्दंड पडणार नसल्याचे परिवहन अधिकारी सावंत यांनी स्पष्ट केले. सध्या मुंबई गोवा महामार्गाची परिस्थिती बिकट आहे. तसेच या महामार्गावर खड्डयाचे साम्राज्य असल्यामुळे वाहतुकीचा प्रश्न उग्ररूप धारण करण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर या महामार्गावरून गणेश भक्तांची गर्दी पाहता आपघात होण्याचीही शक्यता असाल्याने पुणे मार्गे कोकणात जावे यासाठी गणेश भक्तांना टोलच्या रस्त्यावरून मोफत जाण्यासाठी पास देण्यात येत आहेत.
नवी मुंबई मधून कोकणाकडे निघणारी वाहने कोल्हापूर,सातारा मार्गे कोकणाकडे जाण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार विनामूल्य टोल पास देण्यात आहेत .हे पास देताना परिवहन अधिकारी कोकणातील वास्तव्याची पूर्ण शहानिशा करूनच देत असल्याने परिवहन कार्यालयात पास घेण्यासाठी जाताना आपल्या गावासंबंधी पुरावा घेऊनच जावे असे परिवहन अधिकारी सावंत यांनी सांगितले.