गणेशमूर्ती भंगल्याने जळगावात तणाव

0

जळगाव । शहरातील कोळीपेठतील झुंझार गणेश मित्र मंडळात स्थापना करण्यात आलल्या गणेश मुर्तीच्या मंडपाला गुरूवारी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास एका रिक्षाचा धक्का लागल्याने मंडपातील गणेशमूर्ती खाली पडून ती भंगली. यामुळे रिक्षाचालक व कार्यकर्त्यांमध्ये वाद होवून धक्काबुक्की झाली. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण होवून किरकोळ दगडफेकही झाली. यासोबतच रिक्षासह दोन मोटारसारकलींचे नुकसान झाले आहे. दीड तास सुरू असलल्या या गोंधळामुळे धावपळ सुरू होती. परंतू पोलिस प्रशासनातर्फे वेळेवर घटनेची दखल घेत परिस्थिती हाताळण्यात आली. तरी देखील रात्री उशिरापर्रंत कोळीपेठेत तणावाचे वातावरण होते. सारंकाळी गणेश मुर्तीची विधीवत पुजा करून मंडळातर्फे विसर्जन करण्यात आले. यानंतर कार्यकर्त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आठ जणांविरूध्द शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

रिक्षावाल्याने मारला धक्का

जळगाव शहरात गेल्या सात दिवसांपासून शांततेत गणेशोत्सव सुरु आहे. अश्यातच आज गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता शेख आसीफ शेख अजुमुद्दीन हा रिक्षा घेवून कोळीपेठेकडे येत होता. नाल्याच्या पूलाजवळ झुंजार बहुद्देशीय मंडळाने गणपतीची स्थापना केली आहे. रिक्षाचा धक्का त्या मंडपाला लागल्याने मूर्ती हललल्याने ती भंगली. याचा जाब मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विचारल्याने रिक्षाचालक आसिफ व त्यांच्या शाब्दीक वाद झाला. त्यानंतर त्या कुंटुंबातील शेख अजुमुद्दीन शेख गुलाम हुसेन, शेख वसीम शेख अजुमुद्दीन, शेख यासिन शेख अजुमुद्दीन यांनीही वाद घातला. हा वाद विकोपाला गेला. रात दोन्ही गटात धक्काबुक्की झाली. त्यानंतर श्रीं ची मूर्ती भंगल्याची वार्ता पसरल्याने घटनास्थळी संतप्त मंडळाच्या कार्यकर्त्यांचा जमाव जमा झाला.

पोलिस ताफा घटनास्थळी
घटनास्थळी आक्रमक जमाव झाल्याने शनिपेठ पोलिस तात्काळ पोहचले. त्यांनी जमावला समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश न आल्याने डिवायएसपी सचिन सांगळे, दंगा काबू पथक, पोलिस अधिक्षक दत्तात्रय कराळे हे देखील तेथे आलेत. त्यानतंर पोलिसांनी गणेश महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे, ललित चौधरी, दिपक जोशी यांच्यासह पदाधिकार्‍यांना तेथे बोलावून घेतले. आ. सुरेश भोळे यांनीही घटनास्थळी भेट दिली. नगरसेवक कैलास सोनवणे देखील तेथे थांबवून कार्यकर्त्यांना समजावित होते. जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर देखिल या ठिकाणी पोहचले होते. संतप्त जमावाची संपूर्ण अधिकार्‍यांनी समजूत घातली. मात्र, विटंबना करणार्‍यांना अटक करण्याची मागणी जमावाने लावून धरली.

मूर्ती विसर्जनाचा निर्णय
यानंतर पोलिस व महामंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिसरातील संतप्त कार्यकर्ते, महीला व नागिरकांना समजविण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्या मागणीनुसार तात्काळ संबधित चौघांना ताब्यात देखिल घेतले तसेच कठोर कारवाईचे आश्‍वासन पोलिसांनी दिले. तरीही मार्ग निघत नव्हता. या ठिकाणी बैठक घेवून याबाबत चर्चा सुरु असतांनाच दगडफेक झाल्याची अफवा पसरल्याने धावपळ उडाली त्यामुळे पुन्हा तणावाचा भर पडली. अखेर मूर्ती विसर्जनाचा निर्णय घेण्यात आला. यावेळी भंगलेल्या मूर्तीचे विसर्जन करुन त्या ठिकाणी नविन मूर्ती बसविण्याची विनंती पोलिस प्रशासनाने केली त्यासाठी नविन मूर्ती देखिल मंडळाजवळ आणण्यात आली. मात्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी देखिल संयमाची भूमिका घेवून सातवा दिवस असल्याने मूर्तीचे विसर्जन करण्याचा निर्णय घेतला. तसेच नविन मूर्तीची स्थापना न करण्याचा ठरविले. त्यानंतर आरती करुन विधीवत पूजा केल्यानंतर ढोल ताश्यांच्या निनादात मूर्तीच मेहरुण तलावावर नेवून तीचे विसर्जन करण्यात आले. दुपारी साडेतीन वाजता निर्माण झालेला तणाव सायंकाळी साडेपाच वाजता निवळला.

आठ जणांविरूध्द गुन्हा
याप्रकरणी गोपाळ कैलास सैंदाणे (रा. बालाजी पेठ) यांच्या फिर्यादीवरुन शनिपेठ पोलिसात याप्रकरणी 8 जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला तर रिक्षाचालकासह त्याच्या कुंटुबातील चौघांना ताब्यात घेण्यात आले. त्रात शेख अजुमुद्दीन गुलाम हुसेन, शेख आसिफ शेख अजुमुद्दीन, वसिम शेख अजुमुद्दीन व शेख रासीन अजुमुद्दीन या चौघांचा समावेश आहे. रात्री उशीरापर्यंत या भागात बंदोबस्त मात्र कायम ठेवण्यात आला होता. तर पोलिस इतर संशयितांचा देखील शोध घेत आहेत. तर दुपारी घटनास्थळी शहरातील सर्व पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्‍यांनाही बोलवून घेण्यात आले होते.

शांतता राखण्याचे आवाहन
पोलिस प्रशासनाने या प्रकरणी संयमाची भूमिका घेतल्याने तणाव निवळल्याचे दिसून येत होते. दरम्यान, या प्रकरणी कोणत्याही प्रकारच्या अफवा न पसरवता दोन्ही समाजाने सलोख व शांतता राखण्याचे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.