उरुळी कांचन: गणपती उत्सवामध्ये सामुदायिक शक्तीची निर्मिती होते. गणपती म्हणजे चवदा विद्या व चौसष्ठ कला यांच्या जागर करणारे हे दैवत आहे. गणपती उत्सवामध्ये विविध प्रकारच्या कलाकारांना योग्य स्थान मिळून त्यांच्या कलेचे मूल्यमापन होते, व अनेक कलाविष्कार सादर करण्याची संधी त्यांना मिळते. गणेशोत्सवाचा उपयोग सार्वजनिक उपक्रमासाठी व्हावा. गणेशोत्सवातून राष्ट्र हिताची जोपासना व्हावी व समर्पित भावनेने कार्य करणारे राष्ट्रभक्त निर्माण व्हावे असे मत वारकरी मंच महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय विभाग प्रमुख, जेष्ठ समाजसेवक ह भ प डॉ. रवींद्र भोळे यांनी येथे व्यक्त केले. कल्पतरू मित्र मंडळ तळवाडी शिंदवणे रोड येथे गणेशोत्सव कार्यक्रमात डॉ. रवींद्र भोळे यांचे हस्ते श्री ची आरती ओवाळण्यात आली. याप्रसंगी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना वरील मत डॉक्टर रवींद्र भोळे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी परिसरातील अनेक गणेश भक्त, कल्पतरू मित्र मंडळाचे पदाधिकारी ,सदस्य ,कार्यकर्ते उपस्थित होते