गणेशोत्सवात कायदा, सुव्यवस्था राखा

0

मुंबई । गणेश उत्सव मंडळ, शांतता कमिटी मार्गदर्शन बैठक आणि गणेश उत्सव मंडळ 2016 स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ घाटकोपर पोलीस ठाण्यातर्फे आयोजित करण्यात आला होता, या वेळी घाटकोपर विभागातील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांतर्फे मार्गदर्शन करण्यात आले , या वेळी परिमंडळ सातचे उपायुक्त सचिन पाटील घाटकोपर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट पाटील यांनी मार्गदर्शन केले.

गणेशोत्सवाच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था कशी नीट राहील याची काळजी पोलिसांनी आणि गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घ्यायची असल्याचे पोलिसांना तर्फे सांगण्यात आले तर घाटकोपर मधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या विजेत्या मंडळांना बक्षीस वितरण करण्यात आले , सामान्य नागरिकांन मधील असलेला सुजाण नागरिक हा पोलिसांचा मित्र असून तो पोलिसांना मदत करतो म्हणूनच लाखोंच्या संख्येच्या लोकसंख्येला शेकडो पोलीस कायदा आणि सुव्यवस्था ठेऊ शकतात असे सचिन पाटील यांनी सांगितले.