गणेशोत्सवानिमित्त गावी जाणाऱ्यांवर काळाचा घाला; अपघातात तिघांचा मृत्यू

0

मुंबई – गोवा महामार्गावर लांजा तालुक्यात भीषण अपघात झाला असून या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक पुरुष, दोन महिलांचा समावेश असून आणखी तीन जण या अपघातात जखमी झाले आहेत.

कारमधील प्रवासी हे सिंधुदुर्गच्या दिशेने जात होते. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. मुंबईतील चाकरमानी गणेशोत्सवानिमित्त कारने सिंधुदुर्गातील मूळ गावी जात होते. वाकेडघाटीजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या बसला त्यांच्या कारने धडक दिली. जखमींची प्रकृती गंभीर असून त्यांना रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे.