पुणे । सार्वजनिक गणेशोत्सवाचा यावर्षी शतकोत्तर रौप्यमहोत्सव आहे. त्यानिमित्त येत्या 22 ऑगस्ट रोजी महापालिकेच्या वतीने 5 हजार वादकांच्या कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन महापौर मुक्ता टिळक यांनी केले.
श्री शारदा गजानन मंदिराच्या गणेशोत्सव मंडळाच्या वतीने राज्यस्तरीय ढोलताशा स्पर्धांचे उद्घाटन महापौर टिळक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौरांनी ढोलाच्या तालावर ठेका धरत ढोल वाजवून याचा आनंद घेतला. याप्रसंगी गणेश घुले, तात्या कोंडे, संजय साष्टे, दिलीप खैरे, नगरसेवक राजेश येनपुरे, शिवलाल भोसले, नितीन जामगे, संतोष नांगरे, शशिकांत नांगरे, गणेश यादव, राजेंद्र कोरपे, अतुल बेहेरे, सचिन पायगुडे, गणेश झेंडे आदी उपस्थित होते़