गणेशोत्सवानिमित्त विविध उपक्रम

0

शिक्रापूर । येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गणेशोत्सवानिमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. दोन दिवस मुलांच्या रांगोळी, वक्तृत्व स्पर्धा आणि तंदुरुस्त बंदोबस्त उपक्रमांतर्गत शिक्रापूर पोलिस ठाण्याच्या पोलिसांना शेंगदाणा लाडू आणि चिक्की वाटप केले. यावेळी पोलिसांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

यंदा तंदुरुस्त बंदोबस्त उपक्रमांतर्गत शिक्रापूर पोलिसांना शेंगदाणा-लाडू देण्याचा उपक्रम सोमवारी पार पडला. यावेळी पोलिस निरिक्षक रमेश गलांडे, सहाय्यक पोलिस निरिक्षक अतुल भोसले आदी अधिकारी उपस्थित होते. पोलिस 24 तास सेवा बजावतात. तसेच धावपळीच्या कामामध्ये असल्याने त्यांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे पोलिस अधिकारी-कर्मचारी यांनी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, असे मुख्याध्यापिका रोहिणी खंडागळे यांनी सांगितले. केंद्रप्रमुख रत्नमाला मोरे, वर्षा जकाते, मीना धुमाळ, अंजली कोळपकर व शिक्षिक-शिक्षिकांनी या उपक्रमात विशेष योगदान दिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साधना शितोळे यांनी केले तर सुरेखा चव्हाण यांनी आभार मानले.