जळगाव। गणेशोत्सवाला आजपासून सुरूवात झाली असून गेल्या अनेक दिवसांपासून विविध गणेश मंडळाच्या जय्यत तयारीतून श्री गणेश आगमनाची आतुरता प्रकट होत आहे. गणेशोत्सवाचे प्रतिवर्षी मोठे होत जाणारे स्वरूपास भक्तीचे दिशेने नेणे तेवढेच गरजेचे असून, दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हजारो गणेश भक्त व श्री स्वामी समर्थांचे सेवेकरी सामुहिक रित्या गणपती अथर्वशीर्ष पठणाचा अत्युच्च सेवेचे दर्शन घडणार आहे. असेच उपक्रम शहरात सर्व मंडळाद्वारे व राज्यात घडावे या गणपती अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम श्री स्वामी समर्थ केंद्र जळगाव, सुभाष चौक मित्र मंडळ व सुभाष चौक पतसंस्था जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवानिमित्ताने रविवार 27 ऑगस्ट रोजी सकाळी 8.30 वाजता सुभाष चौक मित्र मंडळाच्या मानाच्या गणपती मंदीरासमोरील आवारात भव्य सामुहिक अथर्वशीर्ष पठणाचे आयोजन करण्यात आलेअसल्याची माहिती सुभाष चौक पतसंस्थेचे चेअरमन श्रीकांत खटोड यांनी पत्रपरीषदेत दिली
भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन
सुभाष चौकातमांडव टाकून व तसेच मोकळ्या जागेत देखील बिछायत करून सुमारे 3000 लोकांच्या बसण्याची व्यवस्था केला जाणार असून वातावरण निर्मिती करीता परिसरात आंबा, झेंडुच्या फुलांची तोरणे, भगवे ध्वज, धुप, गोमुत्र शिंपडून पवित्रता आणली जाणार आहे. मांडवात प्रवेश करताच भाविकांना हिंदु संस्कृती प्रमाणे, गंध टिळा लावून गणपती अथर्वशीर्षाचे पूस्तक देण्यात येणार आहे. एकूण 21 आवर्तन 3 हजार लोकांद्वारे होणार प्रमुख आचार्य श्री महेशकुमार त्रिपाठी महाराज व मा.भाऊसाहेब शिंपी यांचे प्रमुख उपस्थितीत ओंकार ध्वनी व शंखनाद शांतीपाठाद्वारे कार्यक्रमाची सुरूवात होईल.
अथर्वशीर्ष पठणानंतर लाख आवर्तनातुन सिद्ध झालेली चांदीची 51 प्रतिमा 51 भक्तांनी लकी ड्रॉ काढण्यात येऊन देण्यात येणार आहे. वाहनांच्या पार्किंगसाठी दाणा बाजार, बोहरा बाजार, तिजोरी गल्ली, सराफ बाजार या ठिकाणी करण्यात आली आहे. भाविकांनी मोठ्या संख्येन उपस्थित राहण्याचे आवाहन सुभाष चौक मित्र मंडळ व सुभाष चौक पतसंस्थातर्फे श्रीकांत खटोड, मनिष अग्रवाल, विजय जगताप व सर्व स्वामी समर्थ केंद्र यांनी केले आहे.
मंत्राद्वारे मिळते उर्जा
पवित्र संस्कृत मंत्राद्वारे वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, तर एकाचवेळी हजारोंच्या मुखातून गणपती ची सर्वोच्च स्तुती अथर्वशीर्ष पठणाचे स्वर वातावरणात मिश्रीत होऊन निर्माण होणार्या उर्जेतून राष्ट्र समृद्धी, जळगाव शहरात व जिल्ह्यात सर्वत्र शांतता रहावी, समृद्धी सुबत्ता एकोपा नांदावा कोणतेही विघ्न येऊ नये श्री गणेश कृपेने विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागती व सुस्कारीत भावी पिढी निर्माण व्हावी हे या कार्यक्रमाचे संकल्प आहेत. भाविकांनी अथर्वशीर्ष कार्यक्रमात सामील होण्याचे आवाहन सुभाष चौक पतसंस्था व स्वामी समर्थ केंद्राच्यावतीने करण्यात आले आहे.