गणेशोत्सवापूर्वी नेरूळमधील सर्व पथदिवे दुरुस्त करा!

0

नवी मुंबई । गणेशोत्सव अवघ्या चार ते पाच दिवसावर आलेला असून नेरूळ मधील काही भागात अजूनही अंधार आहे.यामुळे रात्रीच्या सुमारास स्थानिक रहीवाशांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. या ठिकाणी पालिका प्रशासनाकडून हायमस्ट व अन्य पथदिवे उपलब्ध केले असले तरी त्यातून पुरेसा प्रकाश येत नसल्याने तात्काळ हायमस्टमधील व पथदिव्यामधील बल्ब बदली करण्यात यावेत, अशी मागणी काँग्रेस इंटकचे नवी मुंबई अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

नेरूळ पश्चिमेला राजीव गांधी उड्डाणपुल असून गेल्या काही महिन्यापासून या उड्डाणपुलाखालील परिसरात तसेच लगतच्या परिसरात सांयकाळनंतर अंधुक प्रकाशामुळे स्थानिक रहीवाशांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. या ठिकाणी पालिका प्रशासनाकडून हायमस्ट व अन्य पथदिवे उपलब्ध केले असले तरी त्यातून पुरेसा प्रकाश येत नसल्याने तात्काळ हायमस्टमधील व पथदिव्यामधील बल्ब बदली करण्यात यावेत. अशी मागणी सावंत यांनी केली आहे.

आयुक्तांनी स्वतः समस्यांचे निवारण करावे
नेरूळ पश्चिमेकडील सार्वजनिक तसेच घरगुती गणेशमूर्ती याच भागातून चिंचोलीच्या जुईनगर तलावात विसर्जनासाठी जात असतात. त्यामुळे या समस्येचे गांभीर्य लक्षात घेता युध्दपातळीवर या समस्येचे निवारण झालेच पाहिजे याबाबत संबंधितांना निर्देश देण्याची मागणी रवींद्र सावंत यांनी केली आहे.पथदिव्यांचा पदपथावर उजेड पडत नाही तर रस्त्यावर काय उजेड पडणार. आपण स्वत: या परिसरात येवून समस्येची पाहणी केल्यास आपणास आमच्या तक्रारीमागील गांभीर्य लक्षात येईल.गणेशोत्सवापूर्वी या समस्येचे निवारण करण्यात यावे अशी मागणी सावंत यांनी केली आहे.