गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सव देखील सध्या पद्धतीनेच; नियमावली जाहीर

0

मुंबई: देशभरात कोरोनाचे संकट आहे, त्यामुळे सण-उत्सवांना ब्रेक लागले आहे. यंदाचे गणेशोत्सव देखील कोरोनाच्या संकटामुळे सध्या पद्धतीने साजरा झाला. तसेच यावर्षीचे नवरात्रोत्सव देखील सध्या पद्धतीने साजरा होणार आहे. नवरात्रौत्सव, दुर्गापूजा आणि दसऱ्यासाठी राज्य सरकारच्या गृह विभागाकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

असे आहेत नियम
सार्वजनिक नवरात्रौत्सवातील मूर्ती ४ फूटांपेक्षा तर घरगुती मूर्ती २ फूटांपेक्षा मोठी नसावी. याशिवाय यंदा देवीची मिरवणूक काढता येणार नाही. मंडपांमध्ये सॅनिटाझयरचा वापर करावा लागेल. दर्शन रांगांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळावा लागेल, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

यंदा गरबा, दांडिया कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन गर्दी न करता करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनाचं संकट लक्षात घेता सोशल डिस्टन्सिंगच्या नियमावलीचं पालन करावं, ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या सरकारच्या मोहिमेचा प्रचार जनतेच्या हितासाठी करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. दसऱ्याच्या दिवशी मात्र रावण दहन करता येणार आहे.