गणेशोत्सवामुळे राष्ट्रीय एकात्मता दिसते : भरणे

0

इंदापूर । गणेशोत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता दिसून येते. तसेच सर्व जाती धर्माचे नागरिक एकत्र आणण्याचे कार्य या उत्सवाच्या माध्यमातून होत असल्याचे प्रतिपादन आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले.अंथुर्णे येथे नागेश्वर मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम राबविण्यात आले. तसेच शनिवारी आमदार दत्तात्रय भरणे यांनी सपत्नीक गणरायाची पूजा व आरती करण्यात आली. याप्रसंगी सचिन सपकाळ, रणजित निंबाळकर, सागर मिसाळ, फडतरे आबा यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

दरम्यान, या मंडळाच्या वतीने अंथुर्णेतील छत्रपती हायस्कूल व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींना शालेय साहित्य व लेझीम पथकाचे ड्रेसचे वाटप करण्यात आले. तसेच मंडळाकडून लेक वाचवा-देश वाचवा’ची नाटकाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे.