गणेशोत्सव मंडळांचा कल शिवकालीन देखाव्यांकडे

0

तळेगाव दाभाडे । सार्वजनिक गणेशउत्सावात यावर्षी राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजाच्या जीवनावरील शिवकालीन देखावे सादर करण्याकडे यावर्षी बहुतेक सार्वजनिक मंडळाचा कल दिसून येत असून खुले आणि जिवंत देखावे सादर करण्याची आपली परंपरा काही मंडळे तशीच पुढे चालू ठेवत असल्याचे दिसत आहे. यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव 25 ऑगस्ट रोजी आहे. सार्वजनिक गणेशोत्सवात सादर करण्याचे देखावे, आरास आणि विद्युत रोषणाई ही बहुतेक मंडळांनी निश्चित केलेली आहे. तळेगाव शहरात 100 वर्षापेक्षा जास्त वर्षे झालेली काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. शहरात अतिशय भव्य स्वरुपात देखावे सादर करण्याची परंपरा आहे तर लोकशिक्षण आणि जनजागृती यावर आधारित देखावे दरवर्षी सादर करणारी काही मंडळे आहेत.

ऐतिहासिक पार्श्‍वभूर्मी
लोकमान्य टिळक यांनी तळेगावचा सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केलेला आहे ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या या शहरात लहान मोठी सुमारे 100 मंडळे असून स्पर्धात्मक दृष्ट्या तसेच विद्यायक दृष्टीकोन ठेवून काही मंडळे सामाजिक उपक्रम राबवीत असतात वृक्षारोपण,आरोग्य शिबिरे, वह्या पुस्तके गणवेशवाटप आदी कार्यक्रम होत असतात.

तळेगाव शहरात मनाचा पहिला ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज गणेश मंडळ आहे याशिवाय तिळवण तेली समाज गणेश मंडळ, कालिका गणेश मंडळ, गणेश तरुण मंडळ, राजेद्र चौक गणेश मंडळ, जय बजरंग गणेश मंडळ,सरसेनापती उमाबाई दाभाडे गणेश मंडळ, जय भवानी गणेश मंडळ, धर्मवीर गणेश मंडळ, राष्ट्रतेज गणेश मंडळ,बनेश्वर मित्र मंडळ,चावडी चौक गणेश मंडळ, मुरलीधर गणेश मंडळ,विशाल गणेश मंडळ, हिंदुराज गणेश मंडळ,शाळा चौक गणेश मंडळ, शेतकरी गणेश मंडळ,कान्होबा गणेश मंडळ,भेगडे तालीम गणेश मंडळ,कैकाडी समाज गणेश मंडळ, तरुण ऐक्य गणेश मंडळ, आझाद गणेश मंडळ, अमर खडकेश्वर गणेश मंडळ, पाचपांडव गणेश मंडळ,राव कॉलनी गणेश मंडळ, तुकाराम नगर गणेश मंडळ, डोळसनाथ कॉलनी गणेश मंडळ, जय शंकर गणेश मंडळ, स्वामी विवेकानंद गणेश मंडळ, व्यापरी गणेश मंडळ, मारुती मंदिर चौक गणेश मंडळ, फ्रेंडस क्लब गणेश मंडळ आदी मंडळा कडून देखावे सादर करण्यात येत असतात त्याची कामे सध्या वेगाने चालू असून मूर्तीकार आणि मंडळाचे कार्यकर्ते देखावे उभे करण्यासाठी अहोरात्र कार्यरत आहेत.