गणेशोत्सव मंडळांनाही भेडसावते आर्थिक चणचण

0

मुंबई : मुंबई गणेशोत्सव म्हटले की, आंनदाचा महापूर, मात्र तितकाच तो कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणाराही उत्सव आहे. मात्र यंदाच्या वर्षी मोदी सरकारच्या आर्थिक नीतीचा या उत्सवावर परिणाम होणार आहे. अगदी मूर्ती खरेदीपासून ते जाहीरातींपासून सर्वच पातळीवर मंडळांना नाराजीला सामोरे जावे लागत आहे.

महापालिका, पोलीस यांच्याकडून परवानग्या मिळवण्याची शर्यत पार केल्यानंतरही समस्यांचा डोंगर समोर आहेत. जीएसटी, महारेरा आणि नोटाबंदीमुळे जाहिरातदारांनी हात आखडता घेतला असतानाच, यंदा वर्गणीदेखील कमी मिळाली असल्याचे अनेक गणेशोत्सव मंडळांनी सांगितले असून, गणेशोत्सव समन्वय समितीनेही याला दुजोरा दिला आहे. एकंदर गणेशोत्सवादरम्यान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसमोरील आर्थिक अडचणी वाढतच असल्याचे चित्र आहे. बाप्पाच्या मूर्तीपासून ते सजावटीपर्यंत सर्वच वस्तूंना महागाईचा फटका बसला आहे.