गणेशोत्सव समितीच्या अध्यक्षपदी गोविंदा चौधरी

0

नंदुरबार। येथील मारुती व्यायाम शाळा गणेश उत्सव समितीच्या अध्यक्षपदी गोविंदा चौधरी तर उपाध्यक्षपदी धारु कोळी यांची निवड करण्यात आली आहे. मारुती व्यायाम शाळेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर मराठे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक घेवून कार्यकारिणी निवडण्यात आली.

त्यात अध्यक्षपदी गोविंदा चौधरी, उपाध्यक्षपदी धारु कोळी तर खजिनदारपदी सुर्यकांत मराठे तसेच सदस्यांची निवड करण्यात आली. बैठकीस मोहन मराठे, सतिष मराठे, किशोर मराठे, कैलास चौधरी, संग्राम ठाकूर, अर्जुन मराठे, पांडुरंग मराठे, पिंकोज मराठे, विजय मराठे, विक्की मराठे, उदय मराठे, राहुल मराठे, निलु कोळी, रवी कोळी, योगेश कोळी, सागर कोळी, महेश पवार, सागर पवार आदी उपस्थित होते.