जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे : यावलला समन्वय बैठक
यावल- गणेश विसर्जन मिरवणुकीत पारंपारिक वाद्य वाजवून संस्कृतीचे पालन करा, डीजे, डॉल्बी वाद्यांवर होणारा अनावश्यक खर्च टाळुन तो विधायक कामासाठी वापरा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी आगामी गणेशोत्सव व मोहरम उत्सवानिमित्त आयोजित समन्वयक बैठकप्रसंगी केले. वंचायत समिती सभागृहात शुक्रवार, 7 रोजी सायंकाळी बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोल, अप्पर पोलिस अधीक्षक लोहित मतानी, आमदार हरीभाऊ जावळे, यावल पंचायत समिती सभापती पल्लवी चौधरी, नगराध्यक्ष सुरेखा कोळी, जिल्हा परीषद सदस्य सविता भालेराव, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र रायसिंग व्यासपीठावर उपस्थित होते. गणेश मंडळांना उत्सवा दरम्यान येणार्या समस्या अडचणी जाणून घेत ते सोडवण्याये आश्वासन देत सहकार्य करण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले.
राष्ट्रहिताच्या कार्यासहातभार लावा
उत्सवादरम्यान सामाजीक हिताचे उपक्रम राबवत राष्ट्रहिताच्या कार्यास हातभार लावण्याचे आवाहन जिल्हा अधिकारी किशोर राजे निंबाळकर, आमदार हरिभाऊ जावळे,जिल्हा पोलिस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांनी उपस्थित गणेश मंडळाच्या पदाधिकार्यांना केले. विसर्जन मिरवणुकीस वेळेची मर्यादा वाढवून मिळावी, उत्सवादरम्यान वीजपुरवठा खंडीत होऊ नये, रस्त्यावर लोंबकळणार्या वीज तारा, झाडांच्या फांद्या, विसर्जन मिरवणूक रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची मागणी करण्यात आली.
यांची बैठकीस उपस्थिती
या बैठकीस तालुक्यातील अधिकारी, शासकीय कर्मचारी, सर्वपक्षीय पदाधिकारी, पोलीस पाटील, सार्वजनिक गणेश मंडळांचे पदाधिकारी व शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते. प्रास्ताविक उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र रायसिंग यांनी तर सूत्रसंचलन एस.के.बाऊस्कर यांनी तर आभार पोलीस निरीक्षक दत्तात्रय परदेशी यांनी मानले.