हे देखील वाचा
पिंपरी : महालिकेतर्फे 2017 मध्ये सार्वजनिक गणेश मंडळांसाठी घेण्यात आलेल्या गणेशोत्सव स्पर्धेचे बक्षिस वितरण शुक्रवारी (दि.21) चिंचवड येथे होणार आहे. चिंचवड, येथील अॅटो क्लस्टर सभागृहात दुपारी चार वाजता महापौर राहुल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सोहळा होईल. सण, उत्सवाबाबत न्यायालयीन निर्णयामुळे खर्चावर मर्यादा आल्याने पिंपरी महापालिकेने सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचे बक्षिस वितरण अद्याप केले नाही. पालिकेच्या खर्चातून सण, उत्सव साजरे करण्यास न्यायालयाच्या निर्णयामुळे अडथळा आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे विलंब झाला आहे. त्यामुळे महापालिकेच्या खर्चातून नव्हे तर महापौरांच्या पुढाकारतून भाजप स्वत: हा कार्यक्रम करत असल्याचे, सभागृह नेते एकनाथ पवार यांनी सांगितले.