गणेशोत्सवानंतर विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता !

0

मुंबई : आगामी विधानसभा निवडणूकीसाठी मोर्चेबांधणी आतापासूनच सुरु झाली आहे.निवडणूकीची तारीख केव्हा जाहीर होणार याची उत्सुकता लागली आहे. गणेशोत्सवानंतर विधानसभा निवडणुकीच्या तारखेची घोषणा होण्याची शक्यता आहे. सध्याच्या तेराव्या विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबर 2019 रोजी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे 2019 च्या विधानसभा निवडणुकीची घोषणा गणेशोत्सवानंतर कधीही होऊ शकते.

2014 मध्ये गणेशोत्सवानंतर विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊन दि.12 सप्टेंबरपासून आचारसंहिता लागू झाली होती. दि.15 ऑक्टोबर रोजी मतदान पार पडले होते. आणि दि.19 ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर झाला होता. यानंतर 31 ऑक्टोबर रोजी सरकारचा शपथविधी झाला होतात्यिामुळे आता कोणत्या तारखेला मतदान आणि मतमोजणी होणार याकडे लक्ष लागले आहे.