गणेशोत्सावानिमित्त होणार चित्रकला स्पर्धा 

0
पिंपरी: पर्यावरण संवर्धन समिती अर्थात इसिएतर्फे शैक्षणिक वर्ष 2018-19 च्या गणेशोस्तव दरम्यान शहरातील तरुण पिढीच्या मनावर पर्यावरण संवर्धनाचे संस्कार करण्यासाठी चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यावरणपूरक गणेशोस्तव अशी स्पर्धा होणार आहे.
या उपक्रमामध्ये नावनोंदणी किंवा उपक्रमासंबंधी कोणतीही शंका असल्यास इसिए कार्यालयीन व्यवस्थापक स्नेहल पोवार यांच्याशी या क्रमांकावर 9975336902 संपर्क साधावा. ही स्पर्धा पूर्णपणे विनाशुल्क आहे, त्यामुळे सर्वांनी यात सहभाग घ्यावा असे आवाहन इसिएतर्फे करण्यात आले आहे.