गणेश आचार्यने केला नाना पाटेकरांचा बचाव

0

मुंबई : बॉलीवूडची बोल्ड आणि बिंदास अभिनेत्री तनुश्री दत्ता सध्या एका खळबळजनक वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. नुकतीच अमेरिकेतून परतलेल्या तनुश्रीने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. ही घटना २००९ मध्ये ‘हॉर्न ओके प्लिज’ या चित्रपटाच्या सेटवर घडली होती असा दावा तनुश्रीने केला आहे. यात कोरिओग्राफर गणेश आचार्यलाही तिने दोषी ठरवले होते.

नाना पाटेकर यांनी माझ्यासोबत केलेल्या असभ्य वागणुकीबद्दल अनेक जणांना माहिती होते. गणेश आचार्यही हा सर्व प्रकार पाहत होता. मात्र, तरीही तो माझ्या मदतीला न येता तमाशा पाहत राहिला असे तिने म्हटले होते. आता गणेश आचार्यने तिचे या आरोपवर उत्तर देत म्हणतोय हे सर्व खोटे आहे. या प्रकाराला अनेक वर्ष उलटून गेली असल्यामुळे सेटवर नेमके काय घडले हे माझ्या लक्षात नाही. मात्र, ज्या दिवशी गाण्याचे चित्रीकरण होणार होते त्यादिवशी सेटवर काहीतरी वाद झाले असल्याचे त्याने म्हटले आहे. नक्की काय झाले होते हे जरी मला आठवत नसले तरीही मी हे खात्रीपूर्वक सांगू शकतो की, नानांनी असे काहीही केले नाही. ते अतिशय चांगले व्यक्ती आहेत. हा आरोप खोटा असल्याचे सांगत गणेश आचार्यने नाना पाटेकरांचा बचाव केला आहे.