गणेश उत्सव समितीच्या अध्यक्षपदी दिपक मराठे यांची निवड

0

नंदुरबार। येथील जय हनुमान व्यायाम शाळा गणेश उत्सव समितीच्या अध्यक्षपदी दीपक मराठे तर उपाध्यक्षपदी रविंद्र मराठे यांची निवड करण्यात आली. जय हनुमान व्यायाम शाळेचे सचिव पुरुषोत्तम मराठे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गणेश उत्सव समितीची कार्यकारिणी गठीत करण्यात आली.

गणेश उत्सव समितीच्या अध्यक्षपदी दीपक मराठे, उपाध्यक्षपदी रविंद्र मराठे, सचिवपदी कृष्णा मराठे आणि खजिनदारपदी अ‍ॅड. देवेंद्र मराठे यांची तर सदस्यांमध्ये पप्पू मराठे, प्रविण मराठे, प्रकाश मराठे, नरेश चौधरी, विशाल कुंकारी, राजा मराठे, सुनिल मराठे, नरेश मोची, सचिन चौधरी, हेमंत राजपूत, जयेश मराठे यांची निवड करण्यात आली. विनायक मराठे, तात्या मराठे, मुकेश मराठे, गणेश कानोसे, विलास मराठे, लल्ला मराठे, दादू मराठे, राहुल मराठे, महेंद्र बडगुजर, निलेश कानोसे, बाळा मराठे, गणेश मराठे, बंटी मराठे, हितेश मराठे, योगेश मराठे, रोहित दाणेज, चेतन चौधरी, मयुर कानोसे आदी उपस्थित होते.