नेरुळ । वाशी कोपरी गाव सेक्टर 26 येथील गणेश कृपा मित्र मंडळाच्यावतीने अंडरआर्म भव्य क्रीकेट स्पर्धा भरविण्यात आली होती. या स्पर्धेत अनेक नामांकित संघांनी भाग घेतला होता त्यात जॉज 11 मुंबई संघाने प्रथम क्रमांक पटकावत आकर्षक चषक व रोख रुपये 22 हजार 222 तर द्वितीय क्रमांक श्री गणेश कोपरखैरणे संघाने पटकावला त्यांना आकर्षक चषक व रोख रुपये 11 हजार 111 रुपये देण्यात आले.
यावेळी माजी मंत्री गणेश नाईक, माजी खासदार डॉ.संजीव नाईक, स्थायी समिती सभापती शुभांगी पाटील, आरोग्य समिती सभापती उषाताई भोईर, नगरसेवक सुरज पाटील, समाजसेवक परशुराम ठाकूर, राम विचारे, सोमनाथ घरत, अवतारसिंग बिंद्रा(काळे), वार्ड अध्यक्ष केशव ठाकूर, समाजसेवक महेश पाटील, समीर भोईर, नितीन भोईर अक्षय ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.