जळगाव । शहरातील गणेश कॉलनी ते न्यायालयापर्यंतच्या रस्त्यावर नवीन पोल व विजवाहीनी टाकण्याची मागणी भाजपा नगरसेविका जयश्री पाटील यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन देवून केली. या परिसरात पूर्वीपेक्षा जास्त वस्ती वाढली आहे. तसेच कमर्शियल मार्केट व दुकाने वाढलेली आहेत. यामुळे या वाढीव क्षेत्राचा ताण यंत्रणेवर पडून यंत्रणा अपूर्ण पडत आहे.
नगरसेविका जयश्री पाटील यांनी जिल्हा नियोजन समिती किंवा नाविन्य पूर्ण योजनेतून गणेश कॉलनी चौक ते न्यायालय पर्यतच्या रस्त्यावर नवीन पोल टाकणे व विजवाहीनीसाठी निधी मंजुर करण्याची मागणी करण्यात आली.