14 ऑगस्ट रोजी आढळले मृतदेह; आरोपींना लवकर अटक न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा
नवापुर । 14 ऑगस्ट रोजी गणेश मंजुळकर या बेपत्ता युवकाचा नवापुर शहरापासुन 15 कि.मी अंतरावर उकई धरणाच्या साठ्या लगत नदी पात्रात चार दिवसानंतर पोलिसांना मृतदेह आढळुन आला होता. खुनाच्या गुन्हयातील आरोपींवर जलद कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्रात आली आहे. मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य वडार समाज संघातर्फे पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपुत यांना देण्यात आले.
गणेशचे खुन होऊन महिना होत आला तरी पोलिस यंत्रना संशयीत व्यक्तीपर्यत पोहचण्यात अपयशी ठरलेली दिसुन येत असल्राचा अरोप करीत आहे. गुन्हेगारांना अटक करुन पिडीत कुटुंबीरास योग्य न्याय द्यावा अन्यथा वडार समाज संघटनेतर्फे तिव्र आंदोलन छेडण्रात रेईल असा इशारा देण्रात आलेला आहे. निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष आंबादास आतारकर, उपाध्यक्ष प्रा.मनोज पवार, सचिव प्रा.रामदास भांडेकर, सुभाष कु-हाडे, संजय आतारकर, भाविन आतारकर, संजय मंजुळकर, आनंदा आतारकर, संतोष आतारकर, राजु धनवटे, विजय कुर्हाडे, बाबु कुर्हाडे, विशाल जाधव आदींच्रा सह्या आहेत.