अंबरनाथ – अंबरनाथ शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना यापुढे मंडप तपासणी पथकाचे सहकार्य मिळणार आहे. गणेशोत्सव सणाच्या काळात अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे रस्त्यावर मंडप अथवा पंडालची उभारणी करतात. त्यामुळे नागरिकांना किंवा वाहतुकीला अडथळा होतो. या मंडप आणि पंडालाची तपासणी करण्यासाठी शासनाच्या आदेशाप्रमाणे आता मंडप तपासणी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. अंबरनाथ तालुक्याच्या पथकाची जबाबदारी ही अंबरनाथचे तहसीलदार प्रशांत जोशी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
मुंबई उच्च न्यायालयातील जनहित याचिकेनुसार रस्त्यांवर मंडप अथवा पंडाल उभारताना अनेक मंडळांना अडचणी येेेत असते. या मंडपाची तपासणी करण्यासाठी एक पथक निर्माण करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेेेत. सणाच्या कालावधीत रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी मंडप उभारताना परवानगी मिळणे अवघड जाते. त्यामुळे मंडप तपासणी पथकाची निर्मिती करण्यात आली आहे.
या अधिकार्यांचा समावेश
अंंबरनाथ तालुक्यासाठी 12 अधिकार्यांचे एक पथक स्थापन करण्यात आले आहे. त्याचे प्रमुख म्हणून तहसीलदार प्रशांंत जोशी यांच्यावर जबाबदारी देेेण्यात आली आहे. सोबत या पथकात निवासी नायब तहसीलदार विजय तळेकर, नायब तहसीलदार सावंत, निवडणूक नायब तहसीलदार दत्तात्रय कोष्टी, कुणाल पानसरे, दिपक अनारे, संतोष प्रधान, एस.डी.देसाई, प्रशांत कुमावत, पी.के. पष्टे आणि सिमा मोरे यांचा या पथकात समावेश आहे.
पथकाचे राहणार लक्ष
ज्या मंडळांना मंडप उभारतांना अडचण येत असतील त्यांच्या अडचणींचे निवारण आणि योग्य निर्देशाप्रमाणेे मंडपाची उभारणी करण्याचा सल्ला तपासणी पथकामार्फत दिले जाणार आहे.
नियमाप्रमाणेे मंडप न उभारणार्यांवर या पथकाचे लक्ष राहणार आहे. गणेश मंडळाने या पथकाची मदत घेऊनच योग्य ती मंडप उभारणी करावी असे आवाहन पथकाचे प्रमुख जोशी यांनी केले आहे.