चाळीसगाव – शहरातील गणेश रोडवरील दवाखान्यासमोरुन २६ ऑगस्ट रोजी अज्ञात चोरट्याने बजाज डिस्कव्हर मोटारसायकल चोरुन नेली असुन चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राप्त माहिती नुसार, भडगाव तालुक्यातील वाडे येथील उदयसिंग बाबुसिंग परदेशी (वय-५१) हे त्यांचा दात दुखत असल्याने ते त्यांची बजाज २० हजार रुपये किमतीची (एमएच १९ बीएन ४७२७) डिस्कव्हर मोटारसायकल वर उपचार करण्यासाठी चाळीसगाव येथील गणेश रोडवरील गंगा दातांचा दवाखान्यात २६ ऑगस्ट २०१८ रोजी दुपारी १.५० वाजेच्या सुमारास आले होते दवाखान्याचे काम आटोपुन दुपारी २-१५ वाजता ते दवाखान्यातुन बाहेर आले. त्या दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांची मोटारसायकल चोरुन नेली त्यांनी मोटारसायकलचा शोध घेतला मिळुन आली नाही म्हणुन त्यांनी आज १ रोजी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास पोलीस नाईक संदीप पाटील करीत आहेत.