नेरुळ । 11 दिवसांच्या गणपती विसर्जनाआधी नवी मुंबईमधील खड्डे बुजवण्याची मागणी भाजपचे नवी मुंबई युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष रामदीप हलवाई यांनी केली आहे. नवी मुंबईतील अनेक ठिकाणी अजूनही रस्त्यांवर खड्डे बुजवले गेलेले नसल्याने तसेच 29 ऑगस्ट रोजी पडलेल्या पावसामुळे खड्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यातच तुर्भे येथील रस्त्यांवर तर खड्ड्यांची चाळण झालेली आहे.
त्यामुळे पालिकेने लवकरात लवकर व अनंत चतुर्थीआधी खड्डे बुजवावेत, अशी मागणी केलं भाजपचे हलवाई यांनी केली आहे. याच बरोबर रामदीप हलवाई यांनी नवी मुंबईतील सर्व तालावांच्या पायर्यांवर साठलेले शेवाळे काढून तेथे स्वच्छता करण्याची मागणीदेखील केली आहे. नवी मुंबईतील तलावांमध्ये लहान, मध्यम तसेच मोठ्या आकाराच्या गणेशमूर्तींचे विसर्जन होते. त्यामुळे पायर्यांवर साठलेले शेवाळे साफ करणे गरजेचे आहे अन्यथा मूर्ती विसर्जनात जाताना पाय घसरून पडून दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.