पुणे । गणेश विसर्जनाच्या दिवशी शहरातील प्रमुख 11 रस्ते वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पुणे शहर वाहतूक शाखेने कळवली आहे. 5 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. या कालावधीत वाहनचालकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे.
वाहतुकीसाठी बंद असणारे रस्ते
1) शिवाजी रस्ता-काकासाहेब गाडगीळ पुतळा ते जेधे चौक (सकाळी 7 ते विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत)
2) लक्ष्मी रस्ता-संत कबीर चौक ते अलका थिएटर चौक (सकाळी 7 ते विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत)
3) बगाडे रस्ता-सोन्या मारुती चौक ते फडके हौद चौक (सकाळी 9 ते विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत)
4) बाजीराव रस्ता-बजाज पुतळा चौक ते फुटका बुरुज चौक (दुपारी 12 ते विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत)
5) कुमठेकर रस्ता-टिळक चौक ते चितळे कॉर्नर (दुपारी 12 ते विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत)
6) गणेश रस्ता-दारुवाला पूल ते जिजामाता चौक (सकाळी 10 ते मिरवणूक संपेपर्यंत)
7) केळकर रस्ता-बुधवार चौक ते अलका थिएटर चौक (सकाळी 10 ते विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत)
8) गुरुनानक रस्ता-देवजीबाबा चौक ते हमजेखान चौक ते गोविंद हलवाई चौक (सकाळी 10 ते विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत)
9) टिळक रस्ता जेधे चौक ते टिळक रोड (सकाळी 9 ते विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत)
10) शास्त्री रस्ता – सेनादत्त चौकी ते अलका थिएटर चौक (दुपारी 12 ते विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत)
11) जंगली महाराज रस्ता-झाशी राणी चौक ते खंडोजी बाबा चौक (दुपारी 4 ते विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत)