गणेश ही विद्येची देवता व संकटांचं निवारण करणारी देवता म्हणून प्रसिद्ध आहे. एखाद्या महत्कार्याच्या आरंभी ‘ श्री गणेशाय नम: ‘

मुक्ताईनगर प्रतिनिधी….

गणेश ही विद्येची देवता व संकटांचं निवारण करणारी देवता म्हणून प्रसिद्ध आहे. एखाद्या महत्कार्याच्या आरंभी ‘ श्री गणेशाय नम: ‘ म्हणून गणेशाची स्तुती व आराधना करण्याचा प्रघात आहे

गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण विद्येचा अधिपती गणपती बाप्पांची मोठया भक्तिभावाने स्थापना करून आराधना करतो

विद्येचा अधिपती असलेल्या गणपती बाप्पाची आराधना करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी तर्फे

श्री गणेशा शिक्षणाचा – एक विद्यार्थी एक कार्यकर्ता या घोषवाक्या खाली विद्येची देवता श्री गणेशा च्या उत्सवात शिक्षणा पासून वंचीत उपेक्षितांना विद्येच्या मंदिरात पाठवण्यासाठी

श्री गणेश विद्या अभियान राबवण्याची प्रदेशाध्यक्ष ॲड. रोहिणी खडसे यांनी घोषण केली आहे या अभियानात शाळा बाह्य मुलांना परत शाळेत प्रवेश मिळवून देण्यात येणार असुन हे अभियान 19 सप्टेंबर ते 28सप्टेंबर 2023दरम्यान राबविण्यात येईल

याविषयी माहिती देताना राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष ॲड रोहिणी खडसे म्हणाल्या

 

अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजजाशिवाय शिक्षणाचा हक्क मिळणे ही सध्या काळाची गरज आहे. यासाठी सरकारने बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिकार हा कायदा बनवला आहे

तरीसुद्धा वेगवेगळ्या कारणांनी शिक्षणापासून दुर जाणारे विद्यार्थी हि आपल्या समाजासमोरील जटिल समस्या आहे यात मुख्यत्वे करून ग्रामीण भागात वस्त्या पाड्या मध्ये आदिवासी भागामध्येगरीब गरजू ग्रामीण शेतकरी शेतमजूर

शहरातील झोपडपट्टी, सिग्नल वर भटक्या जमातीतील मुले,

पालकांचे शिक्षणाकडे असलेले दुर्लक्ष व इतर कारणांनी शिक्षणाच्या बाबतीत उदासीन झाले आहेत त्यामुळे अनेक बालके प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहत आहेत काही भागात तर पिढ्यानपिढ्या अशिक्षित राहत आपले आयुष्य ओढत आहेत

शिक्षणाने माणसाला आत्मसन्मान, आत्मविश्वास आणि स्वविकासाच्या संधी मिळतात विचार करणारा, सुसंस्कृत, संवेदनशील, जबाबदार तसेच लोकशाही आणि मानवतेची मूल्य मानणारा नागरिक तयार होतो परंतु या बालकांना मुलभूत शिक्षणा पासूनच वंचीत राहावे लागत असल्याने देशाचे भविष्य असलेल्या मुलांचे जिवन अंधकारमय बनत आहे

 

या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी गणेश चतुर्थीपासून राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने श्री गणेश विद्या अभियान राबविण्यात येणार आहे

या अभियानात राष्ट्रवादी महिला काँग्रेसची पदाधिकारी, कार्यकर्ता आपल्या आजूबाजूच्या वस्त्या पाड्या , झोपडपट्टी व परिसरातील प्राथमिक शिक्षण सोडलेल्या किंवा शाळेत प्रवेश न घेतलेल्या मुलांचा शोध घेऊन या मुलांना शिक्षणासाठी प्रवृत्त करेल त्यासाठी पालकांचे मन वळवेल व त्या विद्यार्थ्याला शाळेपर्यंत नेऊन त्यांचा शाळेत प्रवेश करून देईल

पालिका, जिल्हा परिषद शाळेत केव्हाही प्रवेश घेता येतो विद्यार्थ्याचे वय बघून विद्यार्थ्याला सबंधित वर्गात प्रवेश देण्यात येतो

तसेच महिला पदाधिकाऱ्यांनी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना

प्रायोजक शोधुन प्रायोजका मार्फत वह्या पुस्तके व शालेय साहित्य उपलब्ध करून अभियानाच्या शेवटी कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करावे

 

हे अभियान 19 सप्टेंबर ते 28सप्टेंबर पर्यंत राबविण्यात येणार आहे या अभियानात सहभागी महिला पदाधिकारी, कार्यकर्ता यांचा लेखाजोखा नेत्यांपर्यंत पोहोचावा म्हणुन प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक फॉर्म भरून घेण्यात येईल ज्यात महिला पदाधिकारी कार्यकर्ता यांची संपुर्ण माहिती असेल

 

 

तरी शिक्षणा पासून वंचीत राहत असलेल्या शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणुन विद्येची देवता असलेल्या गणरायांची आराधना करण्यासाठी राष्ट्रवादी महीला आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्ता यांनी या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन प्रदेशाध्यक्षा ॲड रोहिणी खडसे यांनी केले आहे