गणोशपूर उपसरपंचपदी मीनाबाई शेलार

0

चाळीसगाव । तालुक्यातील गणोशपूर व मेहुणबारे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची निवड नुकतीच झाली. गणोशपूर ग्रामपंचायतीचे उपसरपंचपदी मीनाबाई शेलार तर मेहुणबारे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भागवत चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. गणोशपूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाच्या निवडीसाठी सरपंच ज्ञानेश्‍वर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलविण्यात आली होती. बैठकीत सदस्य भागवत हिरे, बापू माने, रावसाहेब पाटील, उज्ज्वला पाटील, विठाबाई भोसले, सुनिता पवार, ग्रामसेवक आधार सोनवणो, शोभाबाई कुंभार, सयाजी हिरे, शिवाजी पाटील, शांताराम शेलार, साहेबराव डोंगरे, शोभाबाई कुंभार, पाणीपुरवठा कर्मचारी सयाजी हिरे यांची उपस्थिती होती.

मेहुणबारे उपसरपंचपदी भागवत चव्हाण
मेहूणबारे येथे उपरसरपंच भरत साळुंखे यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर उपसरपंच निवडीसाठी ग्रामविस्तार अधिकारी अनिल पगारे यांच्या उपस्थितीत सरपंच चंद्रभान जाधव यांनी बैठकीचे आयोजन केले होते. माजी उपसरपंच विपुल चौधरी, रवींद्र जाधव, सुभाष निकम, भरत साळुंखे, जिजाबाई चव्हाण, सुभद्राबाई गढरी, सुशिला साळुंखे, मंगलाबाई चौधरी, चंद्रकला सोनवणो, शेख यासिनाबी मन्यार आदी सदस्यांच्या उपस्थितीत उपसरपंच म्हणून भागवत चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली.