भुसावळ : शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढणारी संख्या पाहता शुक्रवारी गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त होणारे मोठे कार्यक्रम भुसावळसह विभागात रद्द करण्यात आले. मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्स राखून ठिकठिकाणी मात्र अभिषेक व आरती करण्यात आली. शहर व परीसरात मंदिराबाहेरूनच भाविकांनी प्रकट दिनानिमित्त श्रींचे दर्शन घेत गण गण गणात बोतेचा गजर केला.
मंदिराबाहेरून घेतले भाविकांनी दर्शन
यावल रस्त्यावरील श्रींच्या मंदिराच्या बंद दरवाजाजवळ भाविकांनी तेथूनच महाराजांचे मनोभावे दर्शन घेत गण गण गणात बोतेचा गजर केला. शुक्रवारी गजानन महाराज प्रगट दिन असल्याने भाविकांची सकाळपासूनच गर्दी केली मात्र मंदिराचा दरवाजा बंद असल्याने भाविकांचा हिरमोड झाला. प्रगट दिन असल्याने गजानन महाराज नगरातील महाराजांच्या मंदीरात शुक्रवारी सकाळीच महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक करण्यात आला. पूजा, आरती, दुपारची आरती करण्यात आल्यानंतर नैवैद्य दाखविण्यात आला व सायंकाळी आरती करण्यात आली. यावेळी मंदीराचे संचालकांची उपस्थिती होती, भाविकांना कोरोनामुळे मंदीराच्या बाहेरूनच दर्शन घ्यावे लागले.
कोरोनामुळे सार्वजनिक कार्यक्रम
शहरातील विविध भागात दरवर्षी गजानन महराज प्रगट दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन होत असलेतरी यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आले.
यावलमध्ये माजी नगराध्यक्षांनी केला अभिषेक
यावल : शहरात श्री गजानन महाराज मंदिरात दरवर्षी प्रकट दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडत असतो परंतु यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गजानन महाराज मंदिर, विरार नगरात मोजक्या भाविकांसह सकाळी माजी नगराध्यक्ष अतुल पाटील आणि त्यांच्या पत्नी छाया पाटील यांनी मूर्ती अभिषेक आरती केली. अत्यंत साध्या पद्धतीने प्रगट दिन सोहळा पार पडला.