गतीरोधक ठरतात जीवघेणे

0

नवापूर। शहरातील नगर पालिके ने बनवलेले गती रोधक जेष्ठ नागरिक विशेष म्हणजे महिला वाहनधारका साठी डोकेदुखी ठरत आहेत. भूतो न भविष्यती एवढे गती रोधक नगर पालिकेने शहरात तयार केले आहेत. शहरात गल्लो गल्ली डांबरी रस्ते तयार करण्यात आले त्यामुळे वाहन चालकांचा वेग ही वाढत गेला. मोटारसायकल स्वार गल्लो गल्ली वेगाने वाहने चालु लागले त्यामुळे अनेक भागात अपघाताचे प्रमाण वाढले वयोवृद्ध, लहान मुले यांना मोटारसायकल स्वार ठोस मारून जखमी करू लागली .नागरीक नगर पालिके कडे स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी करू लागले नगर पालिकेने देखील त्याची दखल घेत शहरात स्पीड ब्रेकर तयार करून टाकले.

नागरिकांच्या आरोग्याला धोका
शहरातील गतिरोधका मुळे पावसाचे पाणी साचत डबके होऊन नागरिकांच्या आरोग्याला धोका आहे तसेच करोडो रुपये खर्चून बनवलेल्या रस्त्याच्या होणार्‍या नुकसानास जबाबदार कोण ? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. यात रहिवाशीची देखील चुक असुन त्यांनीच नगर पालिकेत जाऊन गतिरोधक बसविण्याची मागणी केली होती आता तीच मागणी नागरिकांना पश्चात्ताप करणारी ठरली आहे

कमी अंतरावर अनेक गतीरोधक
नागरिकांनी यामुळे समाधान व्यक्त केले मात्र कालांतराने हेच स्पीड ब्रेक डोके दुखी ठरले आहेत. स्पीड ब्रेकरची उंची काही ठिकाणी खुपच जास्त तर काही ठिकाणी कमी ठेवली आहे. तसेच कमी अंतरावर अनेक स्पीड ब्रेकर तयार केल्याने वाहन चालकांना शारीरिक व मानसिक त्रास सहन लागत आहे. पावसाळा सुरु झाल्याने आपत्ती व्यवस्थानेचे अक्षरशा धिंडवडे उडवले असून नाले सफाई इलेक्ट्रिक तारा वरील झाडाच्या फांद्या, जीर्ण झालेल्या इमारती या सर्व बाबीवर प्रशासन अगदी शांत असल्याचे चित्र आहे.

कमी अंतरावर अनेक गतीरोधक
नागरिकांनी यामुळे समाधान व्यक्त केले माञ कालांतराने हेच स्पीड ब्रेक डोके दुखी ठरले आहेत , स्पीड ब्रेकरची उंची काही ठिकाणी खुपच जास्त तर काही ठिकाणी कमी ठेवली आहे ,तसेच कमी अंतरावर अनेक स्पीड ब्रेकर तयार केल्याने वाहन चालकांना कंबर व अंग दुखी आजाराला समोरे जावे लागत आहे .आता पावसाळा सुरु झाल्याने आपत्ती व्यवस्थानेचे पालिका प्रशासनाने अक्षरशा धिंडवडे उडवले असून नाले सफाई इलेक्ट्रिक तारा वरील झाडाच्या फांद्या जीर्ण झालेल्या इमारती या सर्व बाबी वर पालिका प्रशासन अगदी शांत असल्याचे चित्र आहे .