गतीरोधक नामशेष होण्याच्या मार्गावर

0

बारामती । बारामती नगरपालिकेने बनविलेले गतीरोधक अवघ्या चार दिवसात उखडले आहेत. त्यामुळे रस्त्यावर खडी पसरलेली आहे. दै. जनशक्तिने 8 जानेवारी 2018 च्या अंकात या गतीरोधकांबाबचे वृत्त प्रसिध्द केले होते. परंतु आता हे गतीरोधक नामशेष होत आहेत. बारामती नगरपालिकेचा भ्रष्ट कारभारच यानिमिताने समोर येताना दिसन आहे.

यातील महत्त्वाची बाब म्हणजे एवढे सगळे घडून देखील नगरपालिकेच्या बांधकाम विभागाचे अधिकारी इकडे फिरकले देखील नाहीत. ही गंभीर बाब आहे. आणखी धक्कादायक बाब म्हणजे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राहत्या घरासमोरच असा प्रकार घडलेला आहे. याचा अर्थ असा की प्रशासन कोणालाच जुमानत नाही. अगर या नगरपालिकेला ठेकेदारांनी पूर्णत: वेढलेले असून कशीही निकृष्ट दर्जाची कामे केली तर बिले आरामात निघतात. हे बारामती शहरातील सर्व गतिरोधक नियमबाह्य झालेले असताना तसेच या ठेकेदाराचे बिल अदा करू नये, अशी चर्चा झाली असतानादेखील अवघ्या एक महिन्याच्या आतच बिल अदा करण्यात आले. यावरून बारामती नगरपालिकेच्या कारभाराची कल्पना न केलेलीच सध्या बारामतीतील नागरीकांमध्ये या गतीरोधकांच्या कामाविषयी चांगली चर्चा रंगली आहे. नागरीक यावर संतप्त झालेली आहेत. या गतीरोधकांवर एखाद्या मोठ्या अपघाताची प्रशासन वाट पाहतेच की काय? अशी प्रतिक्रिया नागरीक व्यक्त करीत आहेत.