मंदिरे उघडण्याबाबत मुख्यमंत्री ठाकरेंचे मोठे वक्तव्य

0

दिवाळीनंतरचे फक्त १५ दिवस स्वत:ला जपा; मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज रविवारी राज्यातील जनतेशी संवाद साधला. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होतांना दिसत आहे. मात्र अजूनही कोरोना संपलेला नाही, काळजी घेण्याची आवश्यकता आहे. युरोपियन देशात कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे. भारतातही ती नाकारता येत नाही. मात्र दिवाळीनंतरचे १५ दिवस स्वत:ला जपा, हे केल्यास दुसरी लाट महाराष्ट्रात येणार नाही असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी हळूहळू राज्यात सर्वकाही सुरु करण्यात आले आहे. मात्र गती देण्याच्या नादात अधोगत नको याची देखील काळजी घेण्यात आली आहे असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली तर त्रेधातिरपीट उडू शकते असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

फटाकेमुक्त दिवाळी साजरी करा
कोरोनाच्या काळात दिवाळीच्या आनंदावर परिणाम होणार आहे. दिवाळी साधेपणाने साजरी करा, आकर्ष सर्व रोषणाई करा मात्र फटाके फोडू नका असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. फटाके न फोडण्याचा संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

राज्यातील मंदिरे कधी उघडणार? असा प्रश्न सातत्याने विचारला जातो आहे. माझ्यावर टीका देखील होत आहे. मात्र तुमच्या काळजीसाठी माझ्यावर टीका झाली तरी मी चिंता करत नाही. दिवाळीनंतर मंदिरे सुरु करू असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.