वास्को । महाराष्ट्र संघाला गेल्य वर्षी उपविजेता राहिला होता.यावर्षी महाराष्ट्र संघाला उपांत्य फेरी गाठण्याची संधी मिळाली होती. मात्र मिझोरामने रेल्वे संघाचा 5-1 अशा फरकाने धुव्वा उडवल्याने याचा परिणाम गुणतालिकेवर झाला.या गुणतालिकेच्या फरकामुळे महाराष्ट्र संघावर स्पर्धेतून बाहेर पडण्याची वेळी आली. महाराष्ट्राला ‘ब’ गटातून तिसर्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्यांनी बलाढ्य केरळचा 2-0 ने पराभव केला.
मिझोरामच्या विजय
वास्कोच्या टिळक मैदानावर झालेल्या सामन्यात महाराष्ट्राने केरळवर वर्चस्व राखले होते. या विजयानंतर महाराष्ट्र संघाचे एकूण सहा गुण झाले. उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी महाराष्ट्र संघाला केवळ एका विजयाची आवश्यकता होती. दुसरीकडे, मिझोराम आणि रेल्वे यांच्यातील सामना अनिर्णित राहणेसुद्धा तितकेच महत्त्वाचे होते. दुसर्या सामन्यात मिझोरामने मात्र रेल्वेचा 5-1 ने धुव्वा उडवला. या निकालाचा फटका महाराष्ट्र संघाला बसला. मिझोराम आणि केरळ यांचे समान गुण होते. केरळ पराभूत झाल्याने मिझोराम दुसर्या स्थानावर पोहोचला. आता गुरुवारी होणार्या उपांत्य फेरीत मिझोरामचा सामना पश्चिम बंगालविरुद्ध तर गोव्याचा सामना केरळविरुद्ध होईल.
महाराष्ट्राने असे केले गोल…
केरळविरुद्धच्या सामन्यात महाराष्ट्राने 34 व्या मिनिटाला आघाडीचा गोल नोंदवला. अॅरॉन डिकॉस्ताच्या क्रॉसिंगवर वैभव शिरळे याने चेंडूला जाळीची दिशा दाखविली. त्यानंतर 40 व्या मिनिटाला महाराष्ट्राला आणखी एक गोल करण्याची संधी होती़; परंतु, वैभवचा फटका गोलपोस्टला लागून बाहेर गेला. मध्यंतरापर्यंत 1-0 आघाडीवर असलेल्या महाराष्ट्राने या सत्रातही जोरकस खेळ केला. 59 व्या मिनिटाला अॅरोन डिकॉस्ताच्या क्रॉसवर श्रीकांत वीरमल्लूने केरळचा गोलरक्षक मेलर्बन दास याला चकवीत शानदार गोल नोंदवला. केरळने पुनरागमनाचा प्रयत्न केला. मात्र, महाराष्ट्राचा बचाव भेदण्यात त्यांना यश आले नाही