नवी दिल्ली-संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. आज दोन्ही सभागृहात विरोधकांनी गदारोळ केल्याने दुपारपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. विविध मुद्द्यावर विरोधकांनी गदारोळ केला.
आज लोकसभेत संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन राफेल कराराबाबत एचएएल कंपनीशी झालेल्या पुराव्याबाबत भाष्य करणार आहे.
दरम्यान आज नागरिकता संशोधन विधेयक २०१६ लोकसभेत मांडण्यात येण्याची शक्यता आहे. पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगानिस्तानमध्ये पिडीत हिंदु, पारशी, सिख, ईसाई, बौद्ध आणि जैन धर्मातील नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्याबाबतचा हा विधेयक आहे. या विधेयकाला विरोध होत आहे.