शिरपूर । तालुक्यातील गधडदेव गावात वनजमिनीच्या वादातून गोळीबार झाल्याची घटना सोमवारी दि.19 रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली होती . दरम्यान गोळीबारात गंभीर जखमी दोघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.दरम्यान बाप बेटयांविरुद्ध सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा नोद्विण्यात आला आहे.आदिवासी लोकांना आदिवासी बहुल भागात शासनाने वनजमिनी केल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून शिरपूर तालुक्यातील गदडदेव या गावात वन जमिनीवरून सारखे वाद सुरू आहेत. अनेक वेळा दगडफेक,गोळीबार झाला असून 2 लोकांचा खून देखील झाला होता. वनजमिनीचा वाद पुन्हा उफाळून आल्याने सोमवारी गावात दोन गटात तुफान दगडफेक व गोळीबार झाल्याचा प्रकार घडला. आंबाराम पावरा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राण्या मेहा पावरा व दिनेश राण्या पावरा या दोघांविरुद्ध सांगवी पोलीस ठाण्यात भादंवि कलम 307,504,506,34 प्रमाणे गुन्हा नोद्विण्यात आला असून पुढील तपास सपोनि किरण खेडकर करीत आहेत.