गरजूंना छत्र्या वाटप

0

पुणे । स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, ग्रामविकास अशा विविध क्षेत्रात लायन्स क्लब महत्वपूर्ण उपक्रम राबवित आहे. गरीब, गरजूंसाठी लायन्स क्लब करीत असलेले हे सेवाकार्य उल्लेखनीय आणि कौतुस्कास्पद आहे, असे प्रतिपादन आमदार माधुरी मिसाळ यांनी केले.

लायन्स क्लब्ज इंटरनॅशनल 3234 डी 2 च्या वतीने अखिल मंडईतील 100 गरीब व गरजू पथारी भाजी विक्रेत्यांना मोठ्या छत्र्यांचे वाटप करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. माजी प्रांतपाल डॉ. चंद्रहास शेट्टी, उपप्रांतपाल रमेश शहा, नगरसेविका अ‍ॅड. गायत्री खडके, लायन सदस्य राजेंद्र गोयल, आनंद आंबेकर, अमृत गुंदेचा, विजय सोनवणे, सतीश राजहंस याप्रसंगी उपस्थित होते.