गरजूंना मदत करून सामाजिक बांधिलकी जपावी : रोकडे

0

ग्रीन मिडॉज वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम

वडगाव मावळ : शहरांमधील प्रगतीचे वातावरण खेड्यांमध्ये दिसू लागले आहे. आधुनिक जगात माणसामाणसातील संवाद हरवत चाललेला आहे. तरीही काही लोकांमध्ये सामाजिक बांधिलकी टिकून आहे. असेच काम ग्रीन मिडॉज सहकारी हौसिंग सोसायटीच्यावतीने केले जात आहे. ग्रीन मिडॉजतर्फे एकता निराधार संघाच्या अनाथ मुलांना जेवणाची सोय केली जाते. या सोसायटीच्यावतीने गरीब, गरजू व वंचितांसाठी समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. वंचितांना मदतीचा हात देणे हीच सामाजिक बांधिलकी आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते कोंडीबा रोकडे यांनी केले. ग्रीन मिडॉजच्या तृतीय वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात रोकडे बोलत होते. यावेळी महिलांसाठी ‘खेळ रंगला पैठणीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या मनीषा काळजे तर सोन्याच्या नथीच्या मानकरी ठरल्या शीतल सोलंकी.

या कार्यक्रमाला माजी सरपंच तानाजी दाभाडे, उपसरपंच बाळासाहेब मोहोळ, सुभाष रायसोनी, गुलाब गादिया, कोंडीबा रोकडे, घेवरचंद ओसवाल, उद्योजक संदीप हांडे, रविकांत रणपिसे, बाळासाहेब गायकवाड, श्रीहरी गायकवाड, रामचंद्र पिंगळे पाटील, नागेश पोटफोडे, सुभाष अहिरे, पी. के. सिंग, अशोक ओव्हाळ, ज्ञानेश्‍वर गवारी, अमित ओव्हाळ, विलास भटेवरा, लिखित नाशिककर आदी उपस्थित होते. ‘खेळ रंगला पैठणीचा’ कार्यक्रम प्रा. महादेव वाघमारे यांनी केला.

पैठणी खेळातील विजेते
या कार्यक्रमातील विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे – प्रथम क्रमांक पैठणी : मनीषा काजळे, द्वितीय क्रमांक सोन्याची नथ : शीतल सोलंकी, तृतीय क्रमांक चांदीचा छल्ला : शीतल अहिरे, चतुर्थ क्रमांक मिक्सर : भावना जैन, पाचवा क्रमांक कुकर : विद्या शेलार व सहावा क्रमांक इस्त्री : कल्पना पोटफोडे. दहा महिलांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. तसेच बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्तविक श्रीहरी गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन उद्योजक संदीप हांडे यांनी केले. ज्ञानेश्‍वर गवारी यांनी आभार मानले.