नगराध्यक्षांच्या पाठपुराव्यानंतर वरणगावी शिबिर ; शिधापत्रिकांपासून वंचित असलेल्या नागरीकांना दिलासा
वरणगाव- वरणगाव शहरातील शिधापत्रिकांपासून वंचित असलेल्या नागरीकांना शासनाच्या माध्यमातून कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर शिधापत्रिकांचे वितरण केले जाईल, असे भुसावळचे प्रभारी तहसीलदार संजय तायडे यांनी सांगितले. वरणगाव नगरपरीषद व महसूल प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने वरणगाव शहरात गरजू नागरीकांना शिधापत्रिका मिळण्यासाठी येथील जुन्या गावातील जिल्हा परीषद शाळेत सोमवारी शासन आपल्यादारी व राजस्व अभियानांतंर्गत शिधापत्रिका शिबिराचे आयोजन करण्यात आले. उद्घाटन प्रभारी तहसीलदार संजय तायडे यांच्या हस्ते झाले.
गरजूंना मिळणार शिधापत्रिका
तायडे यांनी वरणगावातील प्रत्येक गरजू व्यक्तींना शिधावाटप पत्रिकांचे वितरण केले जाणार असल्याचे सांगून गरजू व ज्यांच्याकडे शिधापत्रिका नसेल त्यांना नवीन शिधापत्रिका, फाटलेल्या शिधापत्रिका धारकांना नवीन शिधापत्रिका व ज्यांचे नाव अन्न सुरक्षा योजनेतील यादीत नाव असून सुद्धा धान्य भेटत नसेल त्यांनी अर्जातील माहिती पुर्ण भरून जमा करणे आवश्यक आहे असल्याचे सांगितले.
यांची होती उपस्थिती
नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाक शेख युसूफ, नगरसेवक राजेंद्र चौधरी, माला मेढे, नसरीनबी साजीद कुरेशी, रवींद्र सोनवणे, शशी कोलते, प्रतिभा चौधरी, मेहनाजबी पिंजारी, गणेश चौधरी, मिलिंद मेढे, ईरफान पिंजारी, माजी सरपंच सुकलाल धनगर, शेख सईद शेख भिकारी, शामराव धनगर यांची उपस्थिती होती.
आठ दिवस शिबिर असू द्यावे
नगराध्यक्ष सुनील काळे यांनी शासनाने वरणगाव शहरात जलसंपदामंत्री गिरीश महाजन व अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या आदेशाने शिबिराचे आयोजन केल्याबद्दल आभार मानले व नागरीकांना त्रास होणार नाही यासाठी आठ दिवस वरणगावात शिबिर सुरू ठेवा, अशी मागणी केली.
शिबिराला अधिकार्यांचीही होती उपस्थिती
शिबिराला पुरवठा अधिकारी एम.आर.राठोड, मंडळाधिकारी आर.के.पवार, तलाठी डी.आर.पवार, के.आर.ठाकूर, वैशाली पाटील, श्रीमती गोरले, रत्नांनी, सहाय्यक पुरवठा अधिकारी नागरे, कांबळे व भुसावळ तहसील कार्यालयातील कर्मचारी व कोतवालांची उपस्थिती होती.