चाळीसगाव । अति दुर्गम भागातील आदिवासी परिसरातील स्त्री- पुरुष लहान मुले मुली यांना देण्यासाठी आपल्या घरातील वापरून झालेले किंवा वापरात नसलेले वापरण्या योग्य कपडे वसुंधरा फाउंडेशन चाळीसगाव यांच्या कडे जमा करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. वसुंधरा फाउंडेशन चाळीसगावच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत असून दुर्गम भागातील आदिवासींना कपड्यांची आवशकता असते त्यांना देण्यासाठी घरातील वापरून झालेले वापरात नसलेले कपडे, बूट चप्पल स्वेटर सायंकाळी या लाईफ केअर फार्मा हॉटेल वेलकम खाली तहसील कचेरी जवळ, रामबाण मेडिकल बाजारपेठ, रिलायबल इनव्हेसमेंट बजाज कॉम्प्लेक्स यांच्या कडे जमा करावेत, असे आवाहन सचिन पवार, रविराज परदेशी, देवेन पाटील, गजानन मोरे, सुनील भामरे आदींनी केले आहे.