गरजू रुग्णांसाठी दाखवली तत्परता

0

शहापूर । शहापूर मतदारसंघाचे आमदार पांडुरंग बरोरा यांच्या प्रयत्नाने मतदारसंघातील 16 गरजू रुग्णांना शस्त्रकियेसाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून 10 लाखांची मदत मिळाली आहे. शहापूर मतदारसंघाचे आमदार पांडुरंग बरोरा यांच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात मतदारसंघातील 16 गरजू रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधी मिळवून दिला आहे. 16 रुग्णांना एकूण सुमारे 10 लाखांचा हा निधी गरीब रुग्णांना मिळवून दिला आहे.

विविध आजारांवर होणार उपचार
या 16 रुग्णांवर ठाणे, नाशिक, पुणे, मुंबई या ठिकाणच्या हॉस्पिटलमध्ये विविध आजारांवर शस्त्रक्रिया व उपचारासाठी दहा हजारांपासून ते दीड लाखांपर्यंतची 10 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून करण्यात आली आहे.

आमदार बरोरांचा पाठपुरावा
वर्षांच्या कालावधीत आमदार पांडुरंग बरोरा यांनी या मुख्यमंत्री साहाय्यता निधीचा लाभ आपल्या शहापूर मतदारसंघातील गरजू रुग्णांना मिळवून दिला. या 16 रुग्णांमध्ये 4 महिला रुग्णांचा समावेश असून, आदिवासी आणि ग्रामीण दुर्गम भागातील रुग्णांपर्यंत सरकारच्या या मुख्यमंत्री साहाय्यता निधीची योजना पोहोचवण्यासाठी व लाभ मिळूवन देण्याचे काम आमदार पांडुरंग बरोरा यांनी केले आहे.