गरजू रूग्णांसाठी संपर्क फाउंडेशनची स्थापना

0

** वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांचे प्रतिपादन

जळगाव । ना नफा ना तोटा या तत्त्वांवर संपर्क फाउंडेशन शहरातील गरजु रुग्णांना नर्सिंग सुविधा पुरवत आहे. रुग्णसेवेसाठी फाउंडेशनच्या माध्यमातुन होणारे काम महत्त्वाचे असल्याचे जलसंपदा तथा वैद्यकिय शिक्षणमंत्री गिरीश महाजन फाउंडेशनच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. याप्रसंगी मंचावर कार्यक्रम अध्यक्ष ना.गिरीश महाजन, प्रमुख पाहुणे खासदार ए.टी.नाना पाटील, आमदार राजुमामा भोळे, आमदार चंदूभाई पटेल, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, माजी महापौर ललित कोल्हे, स्वानंद झारे, तसेच कैलास सोनवणे, पिंटू काळे, आबा कापसे , अतुलसिंह हाडा आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक पुरुषोत्तम न्याती यांनी सांगितले की, रुग्णांची रुग्णालयातून सुटी झाल्यानंतर घरी त्याला योग्यपध्दतीने उपचार देणे, त्याची काळजी घेणे यासाठी प्रशिक्षीत नर्सिंग सेवकांची आवशकता असते. रुग्णाच्या परिवाराची ही समस्या लक्षात घेवून संपर्क फाउंडेशनने ना नफा ना तोटा तत्वावर अशा गरजु रुग्णांसाठी नर्सिंग सुविधा उपलब्ध करुन देण्याचा उपक्रम सुरु केला आहे. यासोबत रुग्णवाहिका, नमुना घेणे, वृध्दांची सेवा, मलमपट्टी, फिजियोथैरपी आदी सेवांसाठी संपर्क फाउंडेशनच्या माध्यमातुन सहाय्य केले जाणार आहे असे सांगितले.

या वेळी आ.राजुमामा भोळे यांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून संपर्क फाउंडेशन कार्य करत असल्याचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या. जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी ना.गिरिश महाजन हे आरोग्यदूत म्हणून प्रसिध्द आहेत. रुग्णसेवेत खारीचा वाटा म्हणून संपर्क फाउंडेशन उपक्रम राबवित असल्याचे सांगून कौतुक केले. ना.महाजन यांनी अध्यक्षीय भाषणात वैद्यकियक्षेत्रात 25 वर्षांपासून कार्यरत आहे. ग्रामिणभागातील रुग्णांना शहरात आणून उपचार करण्याचे कार्य केले जात आहे. त्यामुळे संपर्क फाउंडेशनच्या माध्यमातुन केले जाणारे कार्य महत्वाचे आहे. संघाच्या माध्यमातुन रुग्णसेवेचे कार्य व्यवस्थीत सुरु आहे. समाजात अनेक लोक स्वत:ची शुश्रृता करु शकत नाही. त्यामुळे अशा सेवेची गरज वाढत असल्याने संपर्क फाउंडेशनला अधिक कर्मचारी व सहकार्यांची गरज भविष्यात पडणार आहे. याप्रसंगी मान्यवरांचेहस्ते माहिती पत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पुरुषोत्तम न्याती यांनी तर आभार डॉ. स्नेहल फेगडे यांनी मानले.