गरजू लाभार्थी शासकीय योजनांपासून वंचित

0

बोदवड : तालुक्यात पंचायत समिती अंतर्गत अनेक योजनांमध्ये गैरप्रकार व अनियमितता असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये घरकूल योजना, रमाई घरकूल योजना, इंदिरा आवास योजना, महात्मा गांधी रोजगार हमी योजना, वैयक्तिक सिंचन विहीर, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अभियानांतर्गत शौचालय, आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत, शबरी घरकूल योजना, पारधी विकास घरकूल आराखडा योजना यांसह अनेक योजनांमध्ये लाभार्थी व ग्रामसेवक संगनमताने पात्र व गरजू लाभार्थ्यांना लाभ न देता नियमबाह्यपणे लाभ घेतल्याचे दिसून येत आहे.

ग्रामसेवक व बोगस लाभार्थ्यांचे संगनमत
तालुक्यात इंदिरा आवास व रमाई घरकूल योजनेंतर्गत घरकुलाचे तसेच शौचालयाचे बांधकाम न करता अपूर्ण काम पूर्ण दाखवून लाभ घेतल्याचे दिसून येत आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक सिंचन विहिरीचे बोगस मजूर दाखवून जुनीच विहीर दाखविण्यात येवून अनुदान लाटण्यात आले आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालयाचे काम कागदोपत्री, एकाच लाभार्थ्याला दोन वेळा लाभ दाखविण्यात आला आहेे. यासंदर्भात तक्रारी केल्या असता त्याची दखल घेतली जात नाही. यामुळे सरकारच्या निधीचा दुरुपयोग होत असल्याचे दिसून येत आहे. शासकीय नोकरीत असलेल्यांना घरकुलाचा लाभ दिला जात आहे. हा सर्व प्रकार ग्रामसेवक व बोगस लाभार्थी संगनमताने करीत असल्याचे सर्वसामान्यांमध्ये बोलले जात आहे. तरी वरिष्ठ अधिकार्‍यांनी याची गांभिर्याने दखल घेण्याची मागणी सुत्र नागरिकांनी केेली आहे.