वासिंद । आठवीमधील विद्यार्थ्यांसाठी एनएमएमएस शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेच्या मार्गदर्शन शिबिराचे मोफत आयोजन सरस्वती विद्यालय वासिंद येथे रविवार,12 नोव्हेंबर 17 रोजी करण्यात आले. तालुक्यात दरवर्षी बहुसंख्येने सरस्वती विद्यालयातील विद्यार्थी ही शिष्यवृत्ती प्राप्त करतात. यासाठी शिक्षकांची कोणतीही मेहनत घेण्याची तयारी असते. तसेच संस्था आणि विद्यालयाचे प्राचार्य ज्ञानेश्वर काठोळे यांचे मार्गदर्शन असते. या विद्यालयातील विद्यार्थ्यांप्रमाणे इतर अनेक विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्ती परीक्षेचा लाभ मिळावा हा हेतू आहे असे शिबिराचे प्रमुख शाम शेलार यांनी सांगितले. सदर मोफत मार्गदर्शन शिबिरात शहापूर तालुक्यातील शाळांमधील 160 विद्यार्थी उपस्थित होते.
यांची होती उपस्थिती
विद्यार्थ्यांस तज्ज्ञ मार्गदर्शक शिक्षकांकडून विविध विषयांचे मार्गदर्शन लाभले. या शिबिराचे उद्घाटन विठ्ठलराव भेरे (चेअरमन, विद्या विकास मंडळ) व रमाकांत काठोळे (सेक्रेटरी विद्या विकास मंडळ) यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास प्राचार्य डी.डी.काठोळे उपप्राचार्य वाय.बी.अमृतकर पर्यवेक्षक, एस.ए.सापळे, व्ही. टी .भोईर उपस्थित होते. या शिबिरात टी.एस.खारिक, चौधरी सर, सुतार सर, धानके सर , सैंदाणे सर यांनी उत्तम मार्गदर्शन केले. एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेचे प्रमुख एस.एस.शेलार व भाऊ भोईर यांनी उत्तम नियोजन केले. सूत्रसंचालन भालेकर ए.पी.तसेच आभारप्रदर्शन एस.टी.भोईर यांनी केले.