गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

0

तळेगाव दाभाडे : सामाजिक बांधिलकीच्या नात्याने सामाजिक कार्यकर्ते मिलिंद शेलार यांचेवतीने तळेगाव येथील स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मधील गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे यांचे हस्ते आणि तळेगाव एमआयडीसी रोटरी क्लबचे सचिव शंकर हदीमनी यांचे अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना खांडगे म्हणाले की शेलार हे दरवर्षी मावळातील विविध शाळांतील गरीब होतकरु विद्यार्थ्यांना मदत करीत असतात. त्यांचा आदर्श समाजातील लोकांनी घेतला तर गरीब कुटुंबातील मुले शिक्षणापासून वंचित राहाणार नाहीत. प्रत्येकाने यथाशक्ती समाज ऋणातून मुक्त होणे गरजेचे आहे याप्रसंगी संस्थेचे खजिनदार सुदाम दाभाडे, मावळ नागरी पतसंस्थेचे अनिल दणाईत, रोटरीयन हिरामण बोत्रे, दशरथ जांभूळकर व मिलिंद शेलार आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापिका शमशाद शेख यांनी केले. सूत्रसंचालन विनिता बेरा यांनी केले. आभार रेणू शर्मा यांनी मानले.