पाचोरा । पुणे पिंपरी चिंचवड येथील थायसन कृप कंपनीच्या सीएसआर फंडच्या अंतर्गत सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा हेतूने तालुक्यातील विविध शाळांमध्ये शालेय साहित्याचा वाटप नुकतेच करण्यात आले. सर्व औद्योगिक कंपनीना सामाजिक जाणीव असावी या कर्तव्यातून असा निधी खर्च करण्यात येतो. त्याचा योग्य वापर आपल्या पाचोरा तालुक्यातील गावांना होण्याहेतूने व होतकरू गरजु विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप करण्याचा मानस अभियंता विशाल पोपटराव पाटील यांनी निश्चय केला. याच संकल्पनेतून मराठा सेवा संघ व कंपनीच्या संयुक्त विद्यमानाने जि.प. वडगाव टेक, जि.प.वाघुलखेडा, पवार माध्यमिक विद्यालय निंभोरी येथे हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी थायसन कर्मचारी संघाचे अध्यक्ष अनिल गोडसे, उपाध्यक्ष भगवान गायकवाड, भाऊसाहेब पाटील, युवानेते अमोलभाऊ शिंदे, जि.प. सदस्या विजयाताई पाटील, डी.एम. पाटील, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष दीपक पाटील, जारगाव सरपंच सुनील पाटील, विशाल पाटील, शिक्षक भरतीचे पाचोरा तालुका कार्यवाह विनोद पाटील, वीर भगतसिंग परिषदचे विभागीय अध्यक्ष तेजस पाटील, वडगावचे सरपंच व शालेय समितीचे भगवान पाटील, प्रगतशील शेतकरी बापूराव पाटील, वाघुलखेडाचे सरपंच महेंद्र पाटील, गणेश पाटील, शालेय समितीचे मुकुंदा पाटील, पी.सी. पाटील आदी उपस्थित होते.