गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

0

चाळीसगाव। चाळीसगाव शहरालगत असलेल्या व कोदगाव धरणाजवळील भिल्ल वस्तीतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना चाळीसगावात वसुंधरा फाउंडेशन च्या वतीने वह्या व पेनचे वाटप केले आहे. चाळीसगाव शहरात वसुंधरा फाउंडेशन हि संस्था सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. या संस्थेच्या वतीने मंगळवारी 20 जून 2017 रोजी चाळीसगाव शहरातील वामन नगराजवळ असलेल्या भिल्ल वस्तीत व तालुक्यातील कोदगाव धरणाजवळ असलेल्या भिल्ल वस्तीत संस्थेचे गजानन मोरे, सचिन पवार, अजय जोशी, देवेन पाटील, बाळासाहेब पाटील, रवींद्र लांडगे, यांनी गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वह्या व पेन दिले व अभ्यासात लक्ष घालावे व स्वचतेचे मागर्दर्शन केले.

यावेळी जवळपास 70 ते 80 विद्यार्थ्यांना या वस्तूंचा लाभ मिळाला. यावेळी विनायक दवे, हरेश जैन, सह्याद्री प्रतिष्ठानचे दिलीप घोरपडे यांच्यासह पंढरीनाथ पाटील, एकनाथ गायकवाड, सुनील तुवर, श्रावण सोनावणे आदी उपस्थित होते. परिसरातील नागरिक व विद्यार्थ्यांनी वसुंधरा फाउंडेशन चे आभार मानले.