भुसावळ । मुलांच्या वाढदिवसावर खर्च न करता त्यातून वाचणार्या पैशातून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवून त्यांना मदत करणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. असे आवाहन आरपीएफ जवान शंकर एडले यांनी केले. अतंर्नाद प्रतिष्ठानतर्फे गुरुवार 31 रोजी कंडारी येथील वडर वस्तीत 35 गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमास अंतर्नादच्या सदस्यांसह यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी गावातील ज्येष्ठ नागरिक बन्सी मोरे, सरपंच योगिता शिंगारे, सामाजिक विचारमंचचे सदस्य प्रा.धिरज पाटील, भारिपचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, शहिद भगतसिंग फाऊंडेशनचे अध्यक्ष निलेश रायपुरे, डीआरएम कार्यालयात कार्यरत आरपीएफ जवान शंकर एडले, नेव्ही कॅप्टन संदिप रायभोळे, प्रभाकर नेहते, प्रा.श्याम दुसाने, प्रदीप चौधरी, विनोद गायकवाड, रतन मिरटकर, शालिग्राम मिरटकर, शिवराम मिरटकर, लक्ष्मी मिरटकर, गोलू निकम, विठ्ठल तायडे उपस्थित होते. सूत्रसंचालन देव सरकटे तर आभार प्रा.श्याम दुसाने यांनी मानले.